बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई लोकल सामान्यांसाठी सुरू होणार?, राजेश टोपेंचं सुचक वक्तव्य

मुंबई | कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात संपुर्ण देशासह जगभरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबईची जीवनवाहीनी समजली जाणारी मुंबई लोकल गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे बंद करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना आटोक्यात आला असताना पुन्हा एकदा लोकल सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला.

परंतु, डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका उद्भवल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागु करण्यात आले. त्यातच मुंबई लोकलवर पुन्हा एकदा निर्बंध लागु करण्यात आले आणि लोकल सामान्य नागरिकांसाठी पुन्हा एकदा बंद करण्यात आली. आता मुंबई लोकल कधी सुरू होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

मुंबई लोकलबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुचक वक्तव्य केलं आहे. मुंबईची लोकल सुरू करण्याबाबत येत्या 2 दिवसात निर्णय घेतला जाईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बोलुन दाखवलं आहे. तसेच लोकल सुरू करण्याबाबत पुर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असेल, असं देखील राजेश टोपेंनी सांगितलं.

दरम्यान, येत्या 2 दिवसात मुंबई लोकलबाबत नेमका का निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुंबईकर प्रतिक्षेत असलेल्या लोकलच्या निर्णयाबाबत आता काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींची टि्वटरवर कमाल; फॉलोअर्सची संख्या 7 कोटींवर

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबईकरांनी करुन दाखवलं! आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

…अन् आराध्या बच्चनने अभिषेकऐवजी रणबीरला कपूरला बाबा म्हणून मारली मिठी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More