नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की नव्या चेहऱ्याला मिळणार संधी?

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की नव्या चेहऱ्याला मिळणार संधी?

मुंबई |  लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा संपला आहे. 7 टप्प्यांमध्ये झालेला लोकशाहीचा हा उत्सव आता संपला असून सगळेजण फक्त 23 तारखेच्या निकालाचीवाट पाहत आहेत. पण त्या अगोदर या निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो याचा अंदाज देणारे एक्झिट पोल्सचे निकाल आले आहेत.

कोणत्या पक्षाला जास्त जागा मिळणार? या एक्सिट पोलमधून थोड्याच वेळात समोर येणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पीएम होणार का? की आणखी कुठल्या नव्या नेत्याला संधी मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे काँग्रेसला जास्त जागा मिळणार की प्रादेशिक पक्ष वरचढ ठरणार? हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. त्याचं कारण म्हणजे प्रादेशिक पक्ष जर वरचढ ठरले तर त्यांची दावेदारी पंतप्रधानपदावर अधिक असू शकते, असं म्हटलं जातंय.

प्रादेशिक पक्ष वरचढ ठरले तर मायावती, ममता, चंद्राबाबू, शरद पवार पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार असतील. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यास राहुल गांधींना संधी मिळणार का? या सगळ्या गोष्टींचा एक अंदाज थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या

-नवज्योत सिद्धूंना माझ्याजागी मुख्यमंत्री व्हायचं आहे- पंजाबचे मुख्यमंत्री

-“रावसाहेब दानवेंनी आपल्या लायकीनुसार काम करावं”

पश्चिम बंगालमध्ये बाबुल सुप्रियो यांना तृणमूल समर्थकांचा घातला घेराव

-इंदापुरातून सुळेंनाच आघाडी; दिलेला शब्द पाळण्याची काँग्रेसकडे परंपरा- हर्षवर्धन पाटील

-मोदींनंतर साध्वींवर नितीश कुमारही नाराज

Google+ Linkedin