राष्ट्रवादीमध्ये मोठी घरवापसी होणार? अजित पवारांचे संकेत

नवी मुंबई | राष्ट्रवादीचा एखादा उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला असेल, आणि त्याला निवडणूक लढवण्यासाठी पक्षात यायच असेल तर त्याला माफी मागून पक्षात येण्यास काही हरकत नाही असं मोठं विधान अजित पवारांनी केलं आहे.

अजित पवार यांनी नवी मुंबईतील परिवर्तन मेळाव्यात बोलताना हे विधान केलं. निवडणुकांच्या काळात हवा कुठल्या दिशेनं वाहते हे पाहुन अनेक जण निर्णय घेत असतात, असंही ते त्यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीकडे असणाऱ्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी निवडून येणाऱ्या उमेदवारांचा निर्णय शरद पवार घेणार आहेत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी घरवापसी होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजप दंगली घडवणारं सरकार- प्रकाश आंबेडकर

-…तर मला भर चौकात फाशी द्या- धनंजय मुंडे

-अखेर नगरच्या 18 नगरसेवकांवर आली ‘संक्रांत’ मात्र जगताप पिता पुत्रांना राष्ट्रवादीचं अभय

-आता मला पाहायचंय, ‘सामना’चे संपादक काय लिहितात??- अजित पवार

-तू सिर्फ चाय बेच, देश मत बेच; छगन भुजबळांचा मोदींवर हल्लाबोल