मुंबई | मंगळवारी सकाळी सक्तवसुली संचलनालयाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापा मारला. याशिवाय त्यांचे पुत्र विहंग याची चौकशी देखील करण्यात आली. यावर प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केलाय.
प्रताप सरनाईक म्हणाले, “कंगणा राणावत आणि अर्बण गोस्वामी यांच्यावर हक्कभंग तसंच अन्वय नाईक प्रकरणाचा तपास पुन्हा सुरु करायला लावला त्याचदिवशी पुढे काय होणार आहे याचा विचार मी केला होता. महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची जर देशात बदनामी होणार असेल तर मी बोलणारच.”
ते पुढे म्हणाले, “मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची माझी तयारी आहे. ईडीची धाड पडली म्हणून प्रताप सरनाईकाचं तोंड बंद होईल असं होणार नाही.”
“भविष्यात असे अजून प्रसंग आले तरी त्यांना सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलो नाहीये आणि जो अडकलेला नसतो तोच विरोधकांना ठामपणे उत्तर देत असतो,” असंही सरनाईक म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
दुकानात विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!
“उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ आणि शरद पवारांचा ‘शपा’ असा उल्लेख झाला तर…”
काँग्रेस पक्षाचा आधारस्तंभ हरपला; राहुल गांधीची अहमद पटेल यांना श्रद्धांजली
ईडी हे त्यांच्या हातचं बाहुलं झालं आहे- छगन भुजबळ
“हात बरबटलेले नसतील तर ईडीची भीती कशाला?”