बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘डाॅक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर उपचार करणार नाही’; आयएमएचा समाजकंटकांना इशारा

ओनागपूर | कोरोनाकाळात डाॅक्टरांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रूग्णांची सेवा केली. कोरोना महामारीत अनेक डाॅक्टर आणि परिचारिकांनी आपले जीव देखील गमावले आहेत. कोरोनामुळे मृत्यु झाल्यानं रूग्णांच्या नातेवाईकांनी रूग्णालयात गोंधळ घालून डाॅक्टरांना मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर डाॅक्टरांनी संपावर जाण्याचा देखील इशारा दिला होता.

डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवर सरकारी किंवा खासगी रुग्णालयात डॉक्टर उपचार करणार नाहीत, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे यांनी दिला आहे. डॉक्टर व रुग्णालये यांच्यावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ येत्या 18  जून रोजी देशभर निषेध दिन पाळण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संजय देवतळे यांनी दिली आहे.

मृत्युदर कमी राखण्यात राजकीय निर्णय, प्रशासकीय अंमलबजावणी यासह आरोग्य यंत्रणेचा अधिकचा वाटा आहे, हे नाकारून चालणार नाही. जीवाची पर्वा न करता डॉक्टर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना काही समाजकंटक डॉक्टरांवरच हल्ला करीत असल्यानं डॉक्टरांचे मनोधैर्य खचत आहे, असंही डॉ. संजय देवतळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, इंदोरमध्ये काही दिवसांपुर्वीच डाॅक्टरांवर हल्ल्याची गंभीर घटना घडली होती. त्यामुळे रूग्णालयात भीतीचं वातावरण तयार झालं होतं. डाॅक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहीजे, अशा भावना डाॅक्टर व्यक्त करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात

काळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात हिरव्या बुरशीचा पहिला रूग्ण

भारताची कोरोनामुक्तीकडे आगेकुच; कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट

‘दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केलीच नव्हती’; ‘या’ शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा

कोट्यवधींच्या साखरेचं पावसाने मोठं नुकसान; तब्बल 30 हजार पोते भिजले

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More