Top News महाराष्ट्र मुंबई

पंकजा मुंडे शिवसेनेत येणार का?; संजय राऊतांचे सूचक विधान

मुंबई | एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या शिवसेनेत प्रवेशाबद्दल राजकीय चर्चा सुरु झाली आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेच ऑफर देऊ शकतात असं सूचक विधान केलं आहे.

संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी पंकजा मुंडेंच्या शिवसेनेच्या प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता त्यावर ते म्हणाले की, “पंकजा मुंडे या चांगल्या नेत्या आहे. त्यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे जर पंकजा मुंडेंना पक्षात घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील”.

सरकारला एक वर्ष पूर्ण होतं आहे. पण काही लोकांना वाटतं होतं की, हे सरकार 15 दिवसांत कोसळेल. पण हे सरकार पूर्ण ताकदीने चाललेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लढाई यशस्वीपणे सांभाळली आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

शरद पवार सरकार चालवतात हा आरोप चुकीचा असून ते जेष्ठ नेते असल्यामुळे ते महाविकास आघाडी सरकारला मार्गदर्शन करीत असतात. तसेच ते वरिष्ठ नेते असल्यामुळे सरकारला सल्ला देतात. आता या बद्दल चंद्रकांत पाटलांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. कदाचित मोदी आजही पवारांचे मार्गदर्शन घेत असतील, असं म्हणत राऊतांनी चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“बाळासाहेब ठाकरे असताना राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, पण आता… “

“…तर ही धर्मांधता म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल”

दिलासादायक! अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन वर्ग

प्रसंगी कर्ज काढू, पण दिवाळीपूर्वी वेतन देणारच; अनिल परब

पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याच्या कबुलीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या