बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आत्ताची सर्वात मोठी बातमी- परमबीर सिंह पुन्हा पदभार स्वीकारणार?

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मोठी चर्चा रंगली आहे. ती म्हणजे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची. परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या 100 कोटींच्या वसूलीच्या आरोपांमुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे आज मुंबईत दाखल झाले. न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. त्यांच्यावर मुंबईसह विविध भागांमध्ये गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्याने आता पुन्हा एकदा परमबीर सिंह हे पदभार स्विकारणार असल्याचं बोललं जात आहे.

मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली महाराष्ट्राच्या गृहरक्षक दलाच्या महासंचालक पदी बदली करण्यात आली होती. परंतू तिथे पदभार स्विकारण्यापुर्वीच परमबीर सिंह हे गायब झाले होते. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा समोर आले आहेत. त्यांच्या पदाचा जबाबदारी तात्पूरत्या स्वरूपात नागरी संरक्षण विभागाचे पोलिस महासंचालक के.व्यंकटेशम यांच्याकडे देण्यात आली होती.

महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंह यांच्या जागेवर कोणत्याही इतर अधिकाऱ्याची नियुक्ती केली नसल्याने त्यांचा पदभार स्विकारण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं त्यातून स्पष्ट होत आहे. तसेच आता ते पुन्हा एकदा पोलिस दलात आपला पदभार स्विकारणार असल्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या

पोलिसांनी सुरु केलीय वसुली?, आमदारानं पोस्ट केला धक्कादायक व्हिडीओ

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी कारवाई, गृहमंत्र्यांच्या गावात मोठी छापेमारी

11 अभिनेत्री सेक्स रॅकेटमध्ये रंगेहाथ पकडल्या गेल्या, सिनेसृष्टीत खळबळ उडवणारा प्रकार

दिल्लीवरुन सूत्रं हलणार, प्रणिती शिंदेंना मिळणार ही’ मोठी जबाबदारी?

“सदाभाऊ पाय पडले तर पडळकर नांगरे पाटलांना भिऊन…”, सदावर्तेंचे नवे गौप्यस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More