मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत संधी मिळावी अशी मागणी केली जात आहे. यावर जयंत पाटील यांनी खुलासा केलाय.
मी राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. पार्थ पवारांना मंगळवेढ्यातून उमेदवारी देण्यावर अजून कुठलीही चर्चा माझ्या स्तरावर झाली नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
पार्थ पवार यांच्याबद्दल अमरजित पाटील यांनीच मागणी केली आहे. पण हा आमच्या पक्षांतर्गत मुद्दा आहे. त्यांच्या मागणीबद्दल पक्षातील ज्येष्ठ नेते बसून निर्णय घेतील, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, भारत भालके यांच्या जागी राष्ट्रवादी कोणत्या नेत्याला उमेदवारी देणार. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
‘शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये’; या काँग्रेस नेत्यानं संजय राऊतांना फटकारलं
‘बॉक्सिंग डे टेस्ट’ म्हणजे काय?; जाणून घ्या या नावामागील कारण…
“संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करतायत”
मुंबईत मोठं सेक्स रॅकेट उघडकीस; अभिनेत्रीचा सहभाग आढळल्याने खळबळ
अॅमेझॉनला दणका दिल्यानंतर मनसेने पश्चिम रेल्वेला दिला हा इशारा!