कोल्हापूर महाराष्ट्र

पार्थ पवारांना उमेदवारी मिळणार का?; रोहित पवार म्हणतात…

कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत संधी मिळावी अशी मागणी केली जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पार्थ पवार यांना उमदेवारी द्यायची की नाही, याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब, अजितदादा निर्णय घेतील. परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेतली जाईल. योग्य तो न्याय तिथे असलेल्या लोकांना दिला जाईल, असं रोहित पवार म्हणालेत.

कार्यकर्ते बोलून जातात पण निर्णय नेते घेत असतात. कोणी अशी मागणी केली म्हटलं म्हणून लगेच ती मागणी पूर्ण होईलच असंही होत नाही, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी राष्ट्रवादी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. पार्थ पवारांना मंगळवेढ्यातून उमेदवारी देण्यावर अजून कुठलीही चर्चा माझ्या स्तरावर झाली नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या-

गॅस दर कमी केले नाही तर….; रूपाली चाकणकर आक्रमक

लाॅकडाऊनमध्ये अर्जुन कपूरसोबत…; मलायकाचा मोठा खुलासा

‘महाराष्ट्र भाजप रेटून खोटं बोलण्यात इतकी पुढं गेलंय की’; रोहित पवारांची भाजपवर खोचक टीका

‘शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये’; या काँग्रेस नेत्यानं संजय राऊतांना फटकारलं

‘बॉक्सिंग डे टेस्ट’ म्हणजे काय?; जाणून घ्या या नावामागील कारण…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या