बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार?

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिंदेंनी केलेल्या बंडामुळे सरकार कधीही पडू शकतं. अशात एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात कायदा, सुव्यवस्था बिघडल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदेच्या बंडामुळे शिवसैनिही संतापले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांच्या कार्यालय व घरांवर तोडफोड होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास राष्ट्रपती राजवट लागू शकते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यांच्या राजकारणात नवा भूकंप आला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडील आमदारांची संख्या 50 झाली आहे. काल एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल बैठक झाली. या बैठकीची गुप्तता एवढी होती की एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांनाही याची कल्पना नसल्याचं सांगितलं जात आहे.

एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याबाबत राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. त्यातच आता राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या

‘आता तर ते दिसतही नाहीत’; बंडाची आठवण करून देत आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

“देवा लवकर आटप रे सगळं, हॉटेलचं बिल वाढतंय”

“…पण त्यांनी शिवसैनिकांच्या आईवर हात घातला आहे, ते कसे शांत राहातील”

‘आधी नाथ होते आता दास झालेत’, मुख्यमंत्र्यांची खोचक टीका

मोठी बातमी! शिवसेनेला धक्का, शिंदे गटाचे नाव ठरले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More