बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खासगी शाळांची फी 15 टक्क्यांनी कमी होणार?, राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | देशभरात गेल्या दीड वर्षांपासुन कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता कोरोनाकाळात शाळा, काॅलजेस देखिल ऑनलाईन झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरु असतानादेखील खासगी शाळांकडुन फी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असताना शालेय फी दरवाढ करण्यात आली होती.

शालेय शिक्षण ऑनलाईन सुरू असताना शाळा प्रशासनाने फी दरवाढ केल्याने पालकांकडुन मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभुमीवर आता महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. राज्य सरकार खासगी शाळांचा मनमानी कारभार रोखण्यासाठी एक नवा अध्यादेश काढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फी दरवाढीचा निर्णय रद्द करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यातच आता याबाबतीस राज्य सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. 22 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 3 आठवड्यात राज्य सरकारला या संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते.

शालेय शैक्षणिक शुल्क 15 टक्के कमी करा, तसेच शालेय शुल्कवाढीवर येत्या 3 आठवड्यात निर्णय घ्या, असं न्यायालयाकडुन सांगण्यात आलं होतं. त्याच पार्श्वभुमीवर आता राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

केबीसीमध्ये लखपती झालेल्या डॉ. दीपा शर्माचा दरड दुर्घटनेत मृत्यु

“राणे केंद्रीय मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणेच पांढऱ्या पायाचे”

काय सांगता! कोंबडा गेल्यावर मालकाने वाजत-गाजत काढली अंत्ययात्रा

मुंबईतील कोरोना आला आटोक्यात, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More