भोपाल | काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला. सिंधिया यांच्या समर्थक आमदारांनीही राजीनामे दिल्यानं राज्यातलं काँग्रेस सरकार धोक्यात आलं आहे. मात्र आता मध्य प्रदेश सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.
चिंता करण्याची, घाबरण्याची गरज नाही. आम्ही बहुमत सिद्ध करू. आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. ज्या आमदारांना त्यांनी कैद केलं आहे, ते माझ्या संपर्कात आहेत, असं कमलनाथ यांनी म्हटलं. त्यामुळे राज्यातलं सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस कामाला लागल्याचं दिसत आहे.
मुकूल वासनिक, दीपक बावरिया आणि हरिश रावत यांना पक्ष नेतृत्त्वानं दिल्लीहून भोपाळला पाठवलं आहे. तर भाजपनं त्यांच्या सर्व आमदारांना हरयाणातल्या गुरुग्राममधल्या आयटीसी ग्रँड भारत हॉटेलमध्ये हलवलं आहे.
भाजप नेते गोपाल भार्गव यांनी राजीनामा दिलेल्या काँग्रेसच्या 19 आमदारांची यादी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवली. या बैठकीला 94 पेक्षा अधिक आमदार उपस्थित होते, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
Haryana: #MadhyaPradesh BJP MLAs are staying at ITC Grand Bharat in Gurugram. https://t.co/kmoH7nsdB2
— ANI (@ANI) March 10, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोना व्हायरसमुळे इराणमध्ये अडकलेल्या 58 भारतीयांना घेऊन विमान भारतात दाखल
आईचंच काळीज ते….! कोरोनामुळे हवालदिल झालेल्या आईचा काॅल व्हायरल
महत्वाच्या बातम्या-
“105 आमदारवाल्या पक्षानं ‘शॅडो’ मंत्रिमंडळ बनवलं नाही पण एकमेव आमदारवाल्यांनी बनवलं”
सामनाच्या अग्रलेखातून मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर शिवसेनेची बोचरी टीका
कोरोनाच्या धास्तीनं केरळ सरकारने घेतला हो मोठा निर्णय