बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चेन्नईच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची अपडेट! रायडू आयपीएल खेळणार की नाही?, आली मोठी माहिती समोर

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे थांबवण्यात आलेल्या आयपीएलच्या सामन्यांना पुन्हा सुरूवात झाली आहे. चेन्नई आणि मुंबईमध्ये रविवारी पहिला सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला असला तरी चेन्नईने महत्त्वाचा फलंदाज अंबाती रायडू दुखापतग्रस्त झाला आहे. सामना सुरू असताना मुंबईचा गोलंदाज मिलच्या षटकात रायडु दुखापतग्रस्त झाला. त्याला मैदान सोडावं लागलं होतं. अशातच त्याच्या दुखापतीबाबत मोठी माहिती समजली आहे.

अंबाती रायडुला दुखापत झाल्याने चेन्नईच्या चाहत्यांमध्ये नायडु पुन्हा खेळणार का? याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. रायडूलाबरोबर चेन्नईचा गोलंदाज दीपक चाहरला देखील दुखापत झाली आहे. यावर अंबाती रायडूचा एक्स रे आला असून त्याला फ्रॅक्चर नसून त्याला किरकोळ दुखापत झाली असून उर्वरित सामन्यात तो नक्कीच खेळणार असल्याचं चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितलं आहे.

दीपक चहरलाही गोलंदाजी करताना पायाला क्रॅम्प आल्यामुळे त्रास होत होता. मात्र आता तोही ठिक असल्याचं स्टीफन फ्लेमिंग म्हणाले. त्यामुळे चेन्नईसाठी मोठा दिलासा आहे कारण अंबाती रायडू हा आघाडीच्या फळीतील फलंदाज आहे.

दरम्यान,कालचा सामन्यात चेन्नईन सुपर किंग्जने 157 धावांच आव्हान दिलं होतं. मात्र या आव्हानाचा सामना करताना मुंबई इंडियन्सची फलंदाजी ढेपाळली. यामुळे 20 धावांनी मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यामध्ये ऋतुराज गायकवाडने खुप चांगली खेळी केल्याचं महेंद्रसिंग धोनीने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

राष्ट्रवादीच्या ‘या’ चार दिग्गज नेत्यांचे जावई किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर

जावेद अख्तर यांनी शिवसेनेच्या दबावाखाली…; कंगनाचा शिवसेनेवर गंभीर आरोप

“कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एनडीएमध्ये यावं, मोदी सर्वांचा सन्मान करतात”

रश्मी ठाकरेंच्या संपत्तीबाबत सोमय्यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार!

“केवळ मोदी लाटेच्या जीवावर निवडणुका जिंकू शकत नाही कारण…”; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More