Top News महाराष्ट्र मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई |  मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही मुंबईत आपली ताकद वाढवण्यासाठी कंबर कसली आहे.

राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व आणि आमदार रोहित पवार यांच्या नावाने राष्ट्रवादीला नवा चेहरा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवार यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढायला हवी, अशी भूमिका बऱ्याच वेळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे.

दरम्यान, सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष विस्तारावर भर दिला असून, विधानसभा निवडणुकीत मोठी गळती झाल्यामुळे राष्ट्रवादीने सावधं पावलं टाकतं नव्याने नियोजन केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही; त्यांचं अस्तित्व सुपारीवरच”

अर्णब गोस्वामीप्रकरणाचा निकाल लांबणीवर, ‘या’ दिवशी पार पडणार सुनावणी!

“…तर शरद पवार अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचं खारं पाणी गोड करणार- मुख्यमंत्री

“…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज भासणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या