मुंबई | मूळची परळीची असलेल्या पूजा चव्हाणने पुण्यातील महंमदवाडी परिसरातील इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्ये प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मातोश्रीवर दिल्याची चर्चा आहे.
पूजाच्या आत्महत्या प्रकरणामुळं संजय राठोड चांगलेच अडचणीत आले आहेत. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडून संजय राठोड यांच्यासह ठाकरे सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यावरचा दबाव वाढला असल्याचं दिसत आहे. मात्र मुख्यमंत्री राठोडांनी दिलेला राजीनामा स्वीकारणार की नाही? हे महत्त्वाचं आहे.
संजय राठोड यांच्यावर पूजेच्या आत्महत्या प्रकरणी आरोप सुरु झाल्यापासून राठोडांनी अजूनही आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. प्रसारमाध्यमांशी बोलू नका, असे आदेश शिवसेनेने संजय राठोड यांना दिले असल्याची माहितीही समोर येत आहे.
दरम्यान, पूजाच्या आत्महत्येप्रकरणी आपली कोणाविरोधात तक्रार नाही, कोणाविषयी शंका नाही. त्यामुळे आमची आणि आमच्या समाजाची बदनामी करु नका, अशी विनंती पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी केली आहे. तसंच पूजासोबत संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे. ते तिच्या वडिलांसारखे असल्याचंही लहू चव्हाण यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
पंढरपुरात काय वाजतं गाजतं, सोन्याचं बाशिंग… लगीन देवाचं लागतं… पाहा व्हिडीओ
टूलकिट प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; बीडमधला संशयित फरार!
भारतीयांना जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअमवर दिवस-रात्र क्रिकेट सामना पाहण्याची संधी
सावधान!!! कोरोनाचा धोका वाढतोय, आता महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातही संचारबंदी!
सुशांतसिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या; फेसबुकवर शेअर केला व्हिडीओ