अखेर सत्यजीत तांबे ‘त्या’ कारणामुळं भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महत्वाची मानली जात आहे. कारण सत्यजीत तांबे पिता-पुत्राचं बंड हा काॅंग्रेसाठी(Congress) मोठा धक्का आहे. त्यामुळं या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष काय रणनीती आखतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यातली त्यात सत्यजीत तांबे(Satyajeet Tambe) भाजमध्ये(BJP) प्रवेश करतील का नाही याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु सध्या सत्यजीत तांबे भाजमध्ये प्रवेश करणार आहेत अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवता आणि सध्याची राजकीय स्थिती पाहता सत्यजीत तांबेंना भाजमध्ये प्रवेश का करावा लागणार आहे याची आपण सविस्तर माहिती घेऊयात.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीनं अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलाय. त्यामुळं आता ज्या भागात तांबेंचा काॅंग्रेसमुळं राजकीय दबदबा आहे तिथं आता काॅंग्रेसचा पाठिंबा ताबेंना राहिला नाही. त्यातच सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारी घेतली आहेत. आता ताबेंच्या सोबत भाजप आहे, त्यासाठी भाजपनं आपला अधिकृत उमेदवारही जाहीर केला नाही, हे सगळं खरं आहे पण भाजपचे जे केंद्रीय नेतृत्व आहे त्यांच्या नियमानुसार भाजमध्ये कोणत्याही दुसऱ्या पक्षातील नेत्याला उमेदवारी पाहीजे असेल तर त्यांना पक्षात प्रेवश करवा लागतो आणि भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणुक लढवावी लागते.

पण सध्या सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यानं भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणं सत्यजीत तांबेंना शक्य नाही. परंतु तरीही भाजपनं राजकीय खेळी खेळत सत्यजीत तांबेसमोर एक अट ठेवलीयं. जर भाजपचा पाठिंबा हवा असेल तर सत्यजीत तांबेना भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल.

आता जर सत्यजीत तांबेंना या निवडणुकीत जास्त मत मिळवायची असेल तर त्यांना भाजपचा पाठिंबा अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळं तांबेंना भाजपची ही अट मान्य करावीच लागणार आहे. त्यामुळं सत्यजीत तांबेचा भाजमधील प्रवेश निश्चित आहे, अशा चर्चा आहेत. त्यासंदर्भात भाजपच्या एका जेष्ठ नेत्यानं तसं वक्तव्यही केलं आहे. सत्यजीत तांबेंचा दोन-चार दिवसांत भाजमध्ये प्रवेश होणार आहे. राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाना तशी विनंती केली आहे, त्यामुळं लवकरच तांबेंचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असं एका भाजपच्या जेष्ठ नेत्यानं सागितलंय. त्यामुळं सत्यजीत तांबेचा भाजमधील प्रवेशासमोर शिक्कामोर्तब झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

परंतु महत्वाचं म्हणजे सत्यजीत तांबेंचे वडिल सुधीर तांबेंचा अद्याप तरी भाजमध्ये प्रवेश होणार नाही, असंही सांगितलं जातय. त्यामुळं आता येणाऱ्या काळात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More