बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील शाळा बंद होणार का?, वर्षा गायकवाडांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना साथीने शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान केलं आहे. राज्यात पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. अनेक राजकीय नेतेही कोरोना बाधित झाले आहेत. त्यातच आता वाढत्या कोरोनामुळे शाळा पुन्हा बंद होणार का?, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलं आहे.

राज्यात कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे शाळांना खबरदारी बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा शाळा बंद करणे योग्य नाही, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच राज्यात मास्कसक्ती नसली तरी मास्कबाबत पुन्हा एकदा जनजागृती व्हायला हवी, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाची वाढती रूग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे. येत्या 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. तसेच शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही?, यासंदर्भातील निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शालेय शिक्षण विभाग शाळांसाठी नवी नियमावली जारी करणार आहे, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

दरम्यान, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. खबरदारी घेऊन शाळा सुरू करणार आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं . तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयीन परिक्षा ऑफलाईन होणार असल्याचं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

Rajyasabha Election| महाविकास आघाडीला दुसरा मोठा झटका

मोठी बातमी! करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झालेल्या 55 जणांना कोरोनाची लागण

“महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना देखील आवडला असता”

“आम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, शेंबड्या पोराला समजवतात तसं पडळकरांना समजवा”

Monsoon Update: पुढील पाच दिवसात राज्यातील ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More