बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी एक लहान कार्यकर्ता, मला काही…’; शिंदे-फडणवीस भेटीवर राऊत स्पष्टच बोलले

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंड करुन सुरतला गेले तेव्हा त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फोन केला होता. त्यांना त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भेटायला देखील बोलावले होते. परंतु त्यावेळी शिंदेंनी ‘विचार करुन कळवतो’ असे उत्तर दिले होते. त्यानंतर ते उद्धव ठाकरेंना भेटलेच नाहीत. त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. आता त्यांच्या बंडानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत.

या भेटीत काय होणार? याकडे सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली आहे. मी पक्षाचा एक लहान कार्यकर्ता आहे, याबाबत मला काही माहित नाही, असे संजय राऊत म्हणाले. तसेच दीपाली सय्यद ह्या कोणी प्रवक्त्या नाहीत. त्यांना हे अधिकार कोणी दिले? असे म्हणत त्यांनी सय्यद यांना झापले आहे.

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी ही भेट घडवून आणण्याचे प्रयत्न केले असल्याचे कळते. दीपाली सय्यद यांनी ट्विट करत, येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे शिवसैनिकांचा मान राखून चर्चा करण्यासाठी भेटणार आहेत, अशी माहिती दिली. त्यावर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राऊत यांनी यावेळी नव्या सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा 9 हजार 500 कोटींचा निधी थांबविला आहे. मात्र, शिवसेनेचा निधी सुरु ठेवला. हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. अशा प्रकारे निधी थांबविणे चुकीचे आहे, असे यावेळी राऊत म्हणाले. तसेच लांबल्या खातेवाटप कार्यक्रमावर देखील त्यांनी टीका केली.

थोडक्यात बातम्या – 

‘हे बरोबर नाही’, कतरिनाच्या वाढदिवशी नेटकरी विकीवर संतापले

मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेले नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात क्लार्क, दलेर मेंहदीही साथीला

संजय राऊतांनी गजनी सिनेमा पहावा, आशिष शेलारांचा खोचक सल्ला

‘मला या सरकारची फार चिंता वाटते’, अजित पवारांची तुफान टोलेबाजी

‘हे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर’, शिवसेनेची मोदी सरकारवर सडकून टीका

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More