मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व समर्थक आमदारांच्या बंडाळीनंतर शिवसनेत (Shivsena) मोठी फूट पडलेली पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ नगरसेवकही शिंदे गटात सामील होत असल्याने शिवसेनेला पडलेलं भगदाड दिवसेंदिवस मोठं होत आहे.
भाजपच्या (BJP) पाठिंब्यानंतर शिंदे सरकार सत्तेत आलं. यानंतर राज्यात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळालं. भविष्यात शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार का? असा सवाल शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांना विचारला असता त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
गेले 25 वर्ष ते एकत्र काम करत आहेत. त्यामुळे नाही म्हणता येणार नाही, असं सूचक वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केलं आहे. तर सध्याचा निर्णय हा परिस्थितीचा असून सत्तेचा नाही. ते काही एकमेकांचे शत्रू नाहीत, असंही शहाजी बापू म्हणाले आहेत.
दरम्यान, शिंदे आणि ठाकरे एकत्र यावे असं शिंदे गटातील आमदारांना 100 टक्के वाटतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), रश्मी वहिनी (Rashmi Vahini) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आमदारांच्या काळजात आहेत, असं देखील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत असताना शहाजी बापू पाटलांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही’, संजय राऊतांचा घणाघात
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात ‘राज’पुत्राचा समावेश?, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
‘मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा?’, शरद पवारांचं मोठं वक्तव्य
“संजय राऊतांना हटवा, घर जाळायला हेच जबाबदार”
‘…तर उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
Comments are closed.