शिवसेना नेत्या सुषमा अंधारे राजीनामा देणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह भाषणाच्या व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत.

या व्हिडीओत अंधारे यांनी संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ, संत नामदेव यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यांवरून वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. त्यांनी अंधारेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

भागवत संप्रदायातील संतपरंपरेला वाटत असेल, मी चुकत आहे. पण, मी एकाही पक्षाची, राजकीय नेत्याची माफी मागितली नाही, कारण ती माझी स्टाईल आहे. तरीसुद्धा कळत नकळत माझ्या बोलण्याने वारकरी संत सांप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील, तर क्षमा मागण्यासाठी काही गैर वाटणार नाही, असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय.

पहिली गोष्ट म्हणजे मी माफी धारकऱ्यांची मागितलेली नाही. जे सच्चे वारकरी आहेत, जे कदाचित चुकून का होईना माझ्यामुळे दुखावले असतील, तर त्यांची माफी मागायला माझी काहीच हरकत नाही, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, माझ्या पक्षाने जर मला सांगितलं की सुषमाताई, तुमच्यामुळे थोडा त्रास होतोय, तर तेवढं म्हणण्याचीही वेळ मी येऊ देणार नाही. कारण माझा पक्ष माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. माझ्या परक्षासाठी किंवा उद्धव ठाकरेंसाठी काम करायचं असेल, तर ते मी कुठेही राहून करू शकते, असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या-