सोनिया गांधी आणि राहुल गांधी राजीनामा देणार?, काँग्रेसने स्पष्टच सांगितलं…
नवी दिल्ली | देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. देशात अनेकांच लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा यश मिळालं. पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपला मोठा विजय मिळवता आला आहे. पाच राज्यांमधील दारूण पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. त्यातच रविवारी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी राजीनामा देणार, अशा काही चर्चा सुरू होती. काँग्रेस मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीकरिता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेस पक्षाच्या या बैठकीमध्ये पराभवाचा आढावा घेवून पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. काँग्रेसची सर्वोच्च धोरण ठरवणारी CWC ची बैठक होणार आहे. काँग्रेसची पंजाबमधील सत्ता गेली. गोव्यातही काँग्रेस पक्षाला चांगली कामगिरी करता आली नाही. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार केला तरीही पक्षाच्या फक्त दोनच जागा आल्या आहेत.
दरम्यान, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी राजीनामा देणार या बातम्या चुकीच्या असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी कथित राजीनाम्याचे वृत्त अज्ञात स्त्रोतांवर आधारित असून ते पुर्णपणे खोटं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत काँग्रेस काय निर्णय घेणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
पोस्टाच्या ‘या’ योजनेबद्दल ऐकलंय का?, फक्त 95 रूपयात लाखोंचा फायदा होणार
“परमेश्वरानं मला दूरदृष्टी दिली अन् मी भाजपमध्ये आलो”
मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीसांना नोटीस
“माझी आई माझ्या घरी राहते, मी कॅमेरावाल्यांना घेऊन आईला भेटत नाही”
“‘सामना’कार रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थी साठी रवाना, झुकेगा नहीं साला”
Comments are closed.