बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता तरी केंद्र सरकार याचा विचार करणार आहे का?”

मुंबई | बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा फटका आता महाराष्ट्राला बसलेला दिसत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. अशातच शिवसेनेने केंद्र सरकारने मदतची मागणी केली आहे.

गुलाब चक्रीवादळ ज्या राज्यांना धडकले त्या राज्यांना केंद्राने जरूर भरीव मदत करावी. मात्र हे वादळ प्रत्यक्ष न येताही त्याच्या अतिवृष्टीने महाराष्ट्रावर जे भयंकर जलसंकट कोसळले आहे. त्यामुळे केंद्राने त्या महाराष्ट्राचाही विचार करावा, अशी मागणी शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या माध्यामातून केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चक्रीवादळ आणि पाठोपाठ अतिवृष्टी अशी बरीच संकटांची मालिकाच महाराष्ट्रात सुरू आहे. आता तरी केंद्र सरकार त्याचा विचार करणार आहे का?, असा सवाल देखील शिवसेनेने उपस्थित केला आहे. ऑगस्टमध्ये शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला होता. मात्र, सप्टेंबरमध्ये पावसाने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलंय, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य सरकार सर्व परिस्थिचा आढावा सर्व पातळीवर घेतला जात आहे. केंद्रीय पथकाचे दौरे होतच राहतील. मात्र, महाराष्ट्राला तातडीने अर्थसहाय्य पोहचवण्याची गरज आहे. केंद्राने भरीव अर्थसहाय्य देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात संकट ओढावलं असताना, आता तरी केंद्र सरकार मदत करणार आहे का?, असा सवाल आता शिवसेनेने उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“धर्मभेद आणि जातीभेद विसरा, सर्वांना बरोबर घेऊन चालणं तेच खरं हिंदुत्व”

गुलाबनंतर आता ‘या’ वादळाचा धोका; महाराष्ट्राला मोठा फटका बसण्याची शक्यता

ही तर आणीबाणीची वेळ, राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा- राज ठाकरे

मॅक्सवेलचा धमाका! बंगळुरूचा राजस्थानवर 7 गडी राखून दणदणीत विजय

मुुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More