भारत जोडो यात्रेचा समारोप काँग्रेसचं चित्र बदलणार?

नवी दिल्ली | 7 सप्टेंबरला २०२२ ला राहुल गांधीची(Rahul Gandhi) ‘भारत जोडो पदयात्रा’ सुरू झाली आणि याच यात्रेचा सोमवारी समारोपाचा कार्यक्रम झाला. काॅंग्रेससाठी(Congress) ही भारत जोडो यात्रा २०२४ च्या लोकसभा निवडुकीसाठी फलदायी ठरेल आणि राहुल गांधींची प्रतिमा सुधारण्यासाठी ही यात्रा महत्वाची ठरली असं काहींचं म्हणनं आहे. आता कन्याकुमारीपासून सुरू झालेली श्रीनगरपर्यंतची ही यात्रा सफल झाली खरी पण या यात्रेचा राजकारणावर काय परिणाम झाला?, आणि नुकत्याच झालेल्या सर्वेत आगामी लोकभेच्या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाच्या बाजूनं आहे. हेच आपण सविस्तर जाणून घेऊयात.

भारत जोडो यात्रा जेव्हा सुरू झाली तेव्हा भाजपनं(BJP) राहुल गांधींना हलक्यात घेतलं होतं. परंतु जेव्हा भारत जोडो यात्रेला जनतेचा प्रतिसाद मिळत गेला, तेव्हा भाजपलाही याचं गांभीर्य आलं. जेव्हा ही यात्रा सुरू केली, तेव्हा राहुल गांधीही सातत्यानं भाजपला टोला लगावत होते. परंतु नंतर कदाचित त्यांच्या लक्षात आलं असावं की, आपण आता वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं पाहीजे. मग या यात्रेतला सर्वसामान्यांचा सहभाग लक्षात घेता त्यांनी अगदी सामान्यातल्या सामान्य लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घ्यायला सुरूवात केली. मग नागरिकांनीही महागाई असो किंवा बेरोजगारी असो आपल्या समस्या मांडायला सुरूवात केली. यातून झालं असं की, जनतेचा राहुल गांधींवरचा विश्वास कुठं ना कुठं तरी वाढत गेला. परिणामी राहुल गांधी कितीही सांगत असले की, ही यात्रा बिगर राजकीय आहे तरीही ही यात्रा त्यांच्यासाठी अंशत: का होईना राजकीय दृष्टीकानोतून फायद्याची ठरलेली दिसत आहे.

काॅंग्रेसचं अस्तित्व उरलेलं नाही, त्यामुळं भाजपला लोकसभेत विरोध करणारा कोणताही स्ट्राॅंग पक्ष उरला नाही, असं म्हणाणाऱ्यांनाही आता या भारत जोडो यात्रेमुळं तोंडाला कुलूप लावण्याची वेळ आलीय. जर काॅंग्रेसनं समविचारी पक्ष एकत्र घेऊन येणारी लोकसभा निवडणुक लढवली तर भाजपसाठी मोठं आव्हान ठरू शकते. जरी या निवडणुकीत भाजपची सत्ता आली तरीही भाजपची खासदारांची संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

पण सध्या राहुल गांधींच्या या यात्रेबद्दल हे सगळे तर्क-वितर्क सुरू असतानाच एका सर्वेत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत महत्वाची माहिती समोर आलीय.

इंडिया टुडेनं केलेल्या सर्वेत देशातील एक लाख एक्केचाळीस हजार लोकांची मत जाणून घेण्यात आली. या सर्वेनुसार देशात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येईल आणि काॅंग्रेसला ५४३ पैकी १०० जागा मिळवणंही कठीण होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More