पवारांकडून पराभव झालेल्या ‘या’ नेत्याला पंढरपूरमध्ये भाजपचं तिकीट मिळणार?
पंढरपूर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूरमधील स्व. आमदार भारत भालकेंच्या अकाली निधनामुळे पंढरपूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली मात्र राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर केला नाही. तर दुसरीकडे भाजपनेही आपला उमेदवार जाहीर केला नाही. मात्र भाजपमध्ये दोन नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे.
भाजपकडून विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र अशातच कर्जत-जामखेडचे राम शिंदे यांचं नाव समोर आलं आहे. विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदेंना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी पराभूत केलं होतं. त्यांचं नाव आता समोर आल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भाजप जातीय समीकरण जुळवत विजय मिळवण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे भारत नानांचे सुपुत्र भगीरथ भालके हे प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. तर राष्ट्रवादीने जरी उमेदवारी जाहीर केली नसली तरी नानांच्या परिवारातील वारसदारालाच तिकीट दिलं जाणार असल्याचं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी सांगितंल होतं.
दरम्यान, भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर 2020 ला अल्पशा आजाराने निधन झालं होतं. नानांनी आमदारकीची हॅट्रीक मारली होती. तर गोरगरिबांचा दाता म्हणून भारत नाना भालके यांची जनमानसात छबी होती.
थोडक्यात बातम्या-
परमबीरसिंग यांना पहिला झटका; सर्वोच्च न्यायालयानं दिला ‘हा’ सल्ला
“देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा भाजपमध्ये प्रवेश करणार”
“तेव्हा मी खूप नाराज झाले होते”, रिंकू राजगुरुचा मोठा खुलासा
सरकारच्या अडचणीत आणखी वाढ; पुण्यातील कारागृह अधीक्षकाची ‘या’ कारणाने इच्छामरणाची मागणी
संगीत क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी सावनीची वाचा कहानी
Comments are closed.