बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई | ओबीसी आरक्षणावरुन राज्यातील वातावरण चांगलंच पेटलं आहे. ओबीसी आरक्षणावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. अशातच आता ओबीसी आरक्षणाविषयी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

ओबीसी आरक्षणाचं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं आहे. सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेता येणार नाही.

मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार निर्णय घेणार आहे, असे संकेत महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आले होते. त्याप्रमाणे आज विधानसभा आणि विधान परिषदेत आज सरकार यासंदर्भातलं विधेयक मांडले गेले.

दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमताने मंजुरी दिल्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! नवाब मलिकांना ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी

‘…तर मी विधानसभेतच फाशी घेईल’; रवी राणा आक्रमक

“ED आणि BD ची तुम्ही चिंता करु नका, तुमच्या खाजगी कार्यक्रमाची CD निघाली तर…”

‘दाऊद के दलालों को, जुते मारो सालों को’, मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

“…तेव्हा आपले पंतप्रधान वाराणसीच्या गंगाकिनारी डमरू वाजवत होते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More