बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओबीसी आरक्षणाचा विषय निकाली लागणार?; ‘या’ मुद्द्याला राज्यातील सर्व पक्षांचा पाठिंबा

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. याच ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर गंभीर चर्चा झाली. त्यात सर्वपक्षांचं एकमत झाल्याचं पहायला मिळतंय.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून राज्य सरकारने दुसऱ्यांदा सर्वपक्षीय बैठक घेतली. सर्व पक्षांनी एकत्र येत यावर मार्ग काढावा यासाठी या बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकीत ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी इम्पेरिकल डाटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीयांचे एकमत झालं असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

भारत सरकारकडे इम्पेरिकल डाटा तयार आहे. तो जर राज्याला दिला तर आरक्षणाचा प्रश्न मिटेल. फक्त महाराष्ट्रच नाही तर सर्व राज्यांचा इम्पेरिकल डाटावर अधिकार आहे. आरक्षणप्रश्नी आयोजित केलेल्या या बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांचे एकमत झाले. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये या मुद्द्याला सुद्धा सर्वांनी पाठिंबा दिला असल्याचं देखील छगन भुजबळांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली. तर भाजप आणि राष्ट्रवादीने देखील ओबीसी आरक्षणाच्या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आता सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाल्याचं दिसून येतंय.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

स्मशानभूमीकडे जाताना सिद्धार्थ…सिद्धार्थ म्हणत शेहनाजचा आक्रोश, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

दिल्ली विधानसभेमध्ये सापडला एक गुप्त बोगदा, थेट लाल किल्ल्यापर्यंत जातो गुप्त रस्ता???

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More