Top News महाराष्ट्र मुंबई

“शेतकऱ्यांप्रमाणे आक्रमक झाल्यावरच मराठा समाजाचे ऐकणार का?”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी पार पडली. न्यायालयाने  मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. यावरुन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सरकारवर निशाणा साधला.

सरकार तारीख पे तारीख खेळतयं. दिल्लीत शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहे. तसंच आक्रमक झाल्यावर सरकार मराठा समाजाचं ऐकणार का?, असा सवाल विनायक मेटे यांनी सरकारला केला आहे.

आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलाय. कसं काढायचं हे आम्हाला चांगलंच कळतं.  मराठा आरक्षणावर  8 मार्चपासून सुनावणी होणार असून 18 पर्यंत ती संपणार आहे. मात्र आपलं दुर्देव असं की आरक्षणाबाबत सरकारला निर्णय घ्यायला अजून किती वेळ लागणार. किमान आरक्षणावरील अंतिम स्थगिती उठवण्यावर तरी सरकारनं आग्रह धरायला पाहिजे होता, असं मेटे म्हणाले.

दरम्यान, सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेविरोधात राज्यभरात 7 फेब्रुवारी रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचंही मेटेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“आंदोलक शेतकरी देशद्रोही मग अर्णब गोस्वामी, आणि कंगणा राणावत देशप्रेमी आहेत का?”

“भाजपच्या नेत्यांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे”

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही उगाच कशाला नाव घेऊन त्यांना मोठं करायचं”

‘सचिन तेंडुलकर भाजप सरकारचा दलाल’; संभाजी ब्रिगेड आक्रमक

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या