बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काॅंग्रेसला बाजूला ठेवत राष्ट्रवादी तिसरा फ्रंट काढणार? पवारांच्या बैठकीमुळे चर्चांना उधाण

नवी दिल्ली | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकिकडे विरोधक सत्ताधारी पक्षावर सातत्याने टीका करत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार मधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येऊ लागला आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतील त्यांच्या घरी महत्वाची राजकीय बैठक बोलावली होती. या बैठकीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस यांच्यासह इतर 8 पक्षांचे नेते आजच्या या बैठकीला उपस्थित होते. जवळपास अडीच तास ही बैठक चालू होती. मात्र, या बैठकीला काँग्रेसचा एकही नेता नसल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच काॅंग्रेसला बाजूला ठेवत राष्ट्रवादी तिसरा फ्रंट काढणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी याबद्दल प्रश्न विचारला असता राष्ट्रमंचच्या नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. माजीद मेमन म्हणाले की, शरद पवार यांनी भाजपविरोधात ही बैठक बोलावली असल्याची माहिती चुकीची आहे. राष्ट्रमंच प्रमुख यशवंत सिन्हा यांनी ही बैठक बोलावली होती.

तसेच शरद पवारांकडून काँग्रेसला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, हा आरोप चुकीचा आहे. काँग्रेस नेत्यांना देखील या बैठकीसाठी  निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, काही कारणास्तव त्यांना येता आले नाही. काँग्रेसला सोडून काहीतरी शिजत असल्याचा आरोप पुर्णपणे चुकीचा आहे, असंही माजीद मेमन म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

सरकार कोरोनाला नाही तर विरोधकांना घाबरत आहे- चंंद्रकांत पाटील

‘कॉलेज आणि विद्यापीठात मोदींचे आभार मानणारे फलक लावावेत’; युजीसीकडून विद्यापीठांना निर्देश

राहुल गांधींचा मोदी सरकारवर टीकेसाठी नाहीतर मदतीसाठी हात पुढे; म्हणाले…

“सरकार अधिवेशनापासून पळ काढतय, या पळपुट्या सरकारचा जाहीर निषेध”

“तेव्हाच्या पंतप्रधानांमध्ये आणि सध्याच्या पंतप्रधानांमध्ये ‘हा’ फरक आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More