नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो बदलला जाणार का?; आरबीआयने स्पष्टचं सांगितल
नवी दिल्ली| गेल्या काही दिवसांपासून देशात चलनी नोटांवर महात्मा गांधींजीची प्रतिमा बदलून देशातील महापुरूषांची प्रतिमा लावण्यात येणार, अशी चर्चा सुरू आहे. नोटांवर लवकर इतर काही महापुरूषांचे छायाचित्र येणार आहे, अशा बातम्या माध्यमांमध्ये सुरू होत्या. त्यावर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिलं आहे.
भारतीय चलनावरील महात्मा गांधींजींची प्रतिमा बदलण्याचा कोणताही विचार नाही आणि महात्मा गांधीच्या ऐवजी कोणाचाही फोटो लावण्यात येणार नाही, असं रिझर्वँ बँकेने स्पष्ट केलं आहे. रिझर्वं बँकेने स्पष्टीकरण दिल्याने नोटांवरील फोटो बदलण्याच्या चर्चांणा पुर्णविराम मिळाला आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालय आणि आरबीय नोटांवर वॉटरमार्क आणि डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम, रवींद्रनाथ टागोर यांचा फोटो लावणार, अशा चर्चा सुरू होत्या. तसेच भारतीय चलनांवर विविध महापुरूषांच्या प्रतिमा छापण्याची मागणी पुढे येऊ येण्याची शक्यता लक्षात घेता आरबीआयने ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, आरबीआयकडून 1996 सालापासून नोटांवर महात्मा गांधींजीची प्रतिमा छापायला सुरूवात केली. तसेच 1969 साली आरबीआयने महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने महात्मा गांधींची प्रतिमा असलेली नोट छापली होती. तसेच प्रसारमाध्यमांनी दिलेल्या काही बातम्या निराधार असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.
पहा ट्विट-
RBI clarifies: No change in existing Currency and Banknoteshttps://t.co/OmjaKDEuat
— ReserveBankOfIndia (@RBI) June 6, 2022
थोडक्यात बातम्या-
“भीकही कांदा दरांपेक्षा जास्त दिली जाते”; सदाभाऊ खोत संतापले
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
‘लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील…’;पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली
बुद्धी पाहूनच शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार ठरवा- इंदुरीकर महाराज
Comments are closed.