बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी-ठाकरेची ‘ती’ अर्धा तासाची भेट; महाराष्ट्राच्या राजकारणाची कुस बदलणार?

नवी दिल्ली | पंतप्रधान कार्यालयातून भेटीची वेळ मिळाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण 10:45 लाच पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. त्यानंतर 11 वाजता या तिन्ही नेत्यांची मोदींसोबत बैठक सुरू झाली. तब्बल पावणे दोन तास ही भेट झाली. त्यात मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकांतात 30 मिनिटं चर्चा झाली. त्यामुळे बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत.

या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदन येथे येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, ‘मोदी आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ही गोष्ट लपलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही. पण म्हणून आमचं नातं तुटलेलं नाही. मी मोदींना भेटलो म्हणजे काही तरी चूक केलं असं नाही. मी काही नवाब शरीफांना भेटलो नाही. आताही माझ्या सहकाऱ्यांना सांगून मी मोदींना भेटायला जाऊ शकतो’, असं सांगतानाच सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

‘चांगल्या वातावरणात चर्चा झाली असेल, नातं तुटलं नाही असं उद्धव ठाकरे म्हणत असतील तर हे नातं कायमस्वरुपी असायला हवं. दिल्लीत आले म्हणून पंतप्रधानांबाबत किंवा भाजपबरोबरच्या नात्याबाबतचं वक्तव्य संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहे. मोदींच्या चर्चेवर त्यांना समाधान मिळालं असेल आणि नातं तुटलं नाही असं सांगत असतील तर आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. महाराष्ट्राच्या हितानेही ते चांगलं आहे’, असं परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मोदी-ठाकरे भेटीच्या निमित्तानं शिवसेना-भाजप राजकीयदृष्ट्या जवळ येतील असं वाटत नाही. मात्र, मधल्या काळात त्यांच्यात जी कटुता निर्माण झाली होती. ती दूर व्हायला सुरुवात होईल. महाराष्ट्रात आपली सत्ता नसल्यानं मोदींकडून महाराष्ट्राची उपेक्षा सुरू आहे. ती अन्यायकारक आहे. ती उपेक्षा थोड्याफार प्रमाणात थांबेल, असं राजकीय विश्लेषक प्रमोद चुंचुवार यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या –

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावर नवनीत राणा यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या…

कौतुकास्पद! गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावली सनी लियोनी, केलं अन्नाचं वाटप

आजोबांचे व्हायोलिन स्किल्स पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण, पाहा व्हिडीओ

नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्याने शिवसेनेचा जल्लोष

बाॅलिवूडवर शोककळा! कास्टिंग डिरेक्टर सहर अली लतीफ यांचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More