नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेन युद्धानं अवघ्या जगाची चिंता वाढवली आहे. आज सलग पाचव्या दिवशीही युद्ध सुरु आहे. या युद्धाचे पडसाद सगळीकडे उमटत असून याचा गंभीर परिणामही पहायला मिळत आहे.
आता रशिया आणि युक्रेन संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये या दोन्ही देशांदरम्यान बेलारूसमध्ये चर्चेला सुरूवात झाली आहे. बेलारुसमध्ये युक्रेन-रशियामध्ये शांती चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता या चर्चेमुळे युद्ध थांबणार की आणखी पेटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रशिया-युक्रेनच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. या बैठकीनंतर युद्धाचं भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर युद्धाचं काय होणार?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धात अनेक गोष्टींवर परिणाम झाला. बाकीच्या देशांनाही याचा जोरदार फटका सहन करावा लागत आहे. युद्धामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकजण जखमी झाले.
थोडक्यात बातम्या –
संभाजीराजेंना पाठींबा देण्यासाठी 12 वर्षीय मुलाने अडवला राऊतांचा ताफा
अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…
नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ! रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच…
“मोदींनी तात्काळ राज्यपालांची उचलबांगडी करावी, अन्यथा….”
…म्हणून उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे भावूक, डोळ्यात अश्रू तरळले
Comments are closed.