बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी संपाचा तिढा सुटणार का?; गोपीचंद पडळकर म्हणाले…

मुंबई | राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Worker) संपानं वातावरण चांगलंच तापवलं होतं. यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. राजकीय वर्तुळातही खळबळ पहायला मिळाली. मात्र काल एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यात आला.

एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर काल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली. त्यामुळे आता तरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्या, असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.

सरकारनं दिलेल्या वेतन वाढ करण्याच्या निर्णयावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गोपीचंद पडळकर आज 11 वाजता सकाळी माध्यमांसमोर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी भूमिका घेणार आहे. त्यामुळे आता संप मागे घेतला जाणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारनं वेतनवाढीची घोषणा करताच पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ सुरु झाली. यावेळी आम्ही जर राजकारण करतोय असं वाटत असेल तर संपातून  बाहेर पडतो असा इशारा आमदार गोपीचंद पडळकरांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या – 

इंधन दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; वाचा आजचे ताजे दर

RBIनं ‘या’ बॅंकेवर घातली बंदी, खात्यातून फक्त 10 हजार काढण्याची मुभा

काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यासह तब्बल 12 आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

हिवाळ्यात वाढतोय ‘या’ आजाराचा धोका; घ्या ‘ही’ खास काळजी

“शरद पवार तो काळ गेला”; ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा पवारांना इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More