बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लवकरंंच राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार? शेलार-राऊत भेटीने चर्चांना उधाण

मुंंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. भाजप नेते महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. अशातच आता राज्यातील गुप्त बैठकिंचा सिलसिला भाजप शिवसेनेपर्यंत येऊन पोहचला आहे.

आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात या दोन्ही नेत्यांची गुप्त बैठक झाली आहे. जवळपास अर्धातास ही बैठक चालू होती. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राऊत आणि शेलारांच्या या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात या दोन्ही नेत्यांच्या गाड्या माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत. यानंतर लवकरंच राजकीय वर्तुळात मोठा भूकंप येणार, असं बोललं जाऊ लागलं आहे. या भेटीविषयी संजय राऊत आणि आशिष शेलार काय बोलणार?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात अशा भेटी होत असतात. राऊत आणि शेलार चांगले मित्र आहेत. आम्ही आमचं काम करत राहू आणि ते त्यांचं काम करत राहतील. शिवसेनेनं हात पुढे करण्याचा काही विषय नाही आणि तशी शक्यताच नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

पुणे कोरोनामुक्तीकडे! कोरोनाच्या घटत्या रूग्णसंख्येमुळे पुण्यातील ‘हे’ जम्बो कोव्हिड सेंटर बंद

पोलीस विभागाबाबत महत्त्वाची बातमी! ‘पोलीस शिपाईही होणार पीएसआय’, गृहमंत्री वळसे-पाटलांचा प्रस्ताव

“राज्य सरकार वारकऱ्यांना देखील सोडत नाही, त्यांचीही मुस्कटदाबी करत आहे”

एक आजार ज्यामुळे आपलं होत आहे दगडात रुपांतर , ‘या’ चिमुकलीचं शरीर झालं दगडागत!

कल्पना चावलानंतर ‘ही’ भारतीय तरुणी घेणार अंतराळात झेप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More