राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार?; ‘या’ आमदाराने टेंशन वाढवलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसला (Ncp) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार आमदार अण्णा बनसोडे (Mla Anna Bansode) यांनी शिंदे गटात जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अण्णा बनसोडे यांच्या पोस्टमुळे पिंपरी चिंचवड महापालिका (PMC) निवडणुकीच्या (Election) तोंडावर राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अण्णा बनसोडे शिंदे गटात गेल्यास राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना, त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार. माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे….माननीय आमदार अण्णा साहेब बनसोडे… राजकरणापलीकडची मैत्री, असं या फेसबुक पोस्टमधून म्हटलं आहे.

ही पोस्ट लिहून बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केलं आहे. तसेच पोस्टवर BHAI & BOSS हे दोन हॅशटॅग वापरण्यात आले आहेत.

दरम्यान, काही तरी नवीन सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. जेव्हा नवीन काही तरी सुरू करू तव्हा आपलीच चर्चा होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा राष्ट्रवादीसाठी सूचक इशारा असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-