Top News देश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा!

नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादूर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक घेणार आहेत.

ज्या राज्यातील कोरोना केसेसची संख्या जास्त आहे, त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान सर्वात आधी बैठक घेणार आहेत. म्हणजेच पहिल्या टप्प्यातील बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असतील.

24 नोव्हेंबरला सकाळी 10 किंवा 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. ही बैठक 2 टप्प्यांमध्ये पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दुसऱ्या टप्प्यात उर्वरित राज्यांचे मुख्यमंत्री या महत्वाच्या बैठकीत सामील होतील. दुसऱ्या टप्प्यातील बैठकीला दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

शहीद जवान संग्राम पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरात दाखल

“पक्षात कुणालाही कोणतंही पद मिळतं, फाईव्ह स्टार कल्चरने निवडणुका जिंकता येत नाहीत”

गोव्यात समविचारी पक्षांशी युतीची तयारी- प्रफुल्ल पटेल

“महामारीचे बाप बनून लोकांच्या जिवाशी का खेळता?”

आम्हाला चंपा, टरबुजा बोललेलं कसं चालतं?- चंद्रकांत पाटील

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या