महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार?, फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई | राजकारणामध्ये सर्व विरोधकांना माफ केलं आहे. झालं गेलं सगळं विसरून जा, असं आवाहन करत देवेंद्र फडणवीस यांनी धुळवडीनिमित्त आयोजित एका उद्धव ठाकरेंच्या पक्षाला एकप्रकारे साद घातली आहे.

एकेकाळी आपण बदल्याची भाषा केली होती, पण आता सर्व वैर होळीच्या आगीमध्ये स्वाहा केल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

वर्षाचे 365 दिवस शिमगा करणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. 365 दिवस शिमगा साजरा करण्यापेक्षा एकच दिवस शिमगा साजरा करा, असा टोला फडणवीसांनी संजय राऊत यांचं नाव न घेता लगावला आहे.

दरम्यान, मी विरोधकांना विनंती करतो, आजपासून मतभेद आणि मनभेद दूर करून हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीकोनातून पुढे कसा जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन कसं हे राज्य पुढे नेता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-