बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजकीय भुकंप होणार?; देवेंद्र फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्त्वाचे संकेत

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अनेक हालचाली होत असलेल्या पहायला मिळत आहे. राजकीय हालचालींना वेग आला असून लवकरच राजकीय भुकंप पहायला मिळणार असल्याचे संकेत दिसत आहेत. अशातच आज भाजप (BJP) पक्ष स्थापना दिननिमित्तानं भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

येत्या काळात मोठा संघर्ष उभा करावा लागणारं आहे. दबावाला बिलकुल बळी पडू नका. मुंबईत आणि महाराष्ट्रात येत्या काळात एक नवा संघर्ष उभा करू. यांना सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय आपली लढाई ही थांबणार नाही. हाच विश्वास स्थापना दिनाच्या निमित्ताने उपस्थित करतो, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

माझा शिवसेनेला सवाल आहे कि तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची कितवी टीम आहे. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असं म्हणत फडणवीसांनी पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरेंनाही सुनावलं आहे.

दरम्यान, घराणेशाहीने विश्वासघाताने डोकंवर काढलं आहे. मुंबई पालिकेत घराणेशाहीचा पराभव होणार आहे. ही काळ्या पाटीवरील पांढरी रेख आहे, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, न्यायालयानं दिला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराविषयी एकनाथ खडसेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले…

“किरीट सोमय्या ही महाराष्ट्राला लागलेली कीड, ही कीड मी संपवणार”

“खोटं बोल पण नेटानं बोल हा संजय राऊत यांचा स्वाभाव”

CNG गाड्या वापरणाऱ्यांना मोठा झटका, ‘ही’ महत्त्वाची बातमी आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More