बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजगडावर रोपवे होणार का?; आमदार संग्राम थोपटेंनी दिलं हे स्पष्टीकरण

मुंबई | पुणे जिल्ह्यातील एकविरा देवी मंदिर आणि राजगड किल्ल्यावर पर्यटकांना लवकरच रोपवेची सुविधा उपलब्ध होणार आहे. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या करण्यात आल्या. पर्यटन विभागाकडून हा रोपवे बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला काही शिवप्रेमींनी आणि काही संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

वेल्हे-राजगड किल्ल्यावर होणारा रोपवे हा सर्वांच्या मतानुसार होईल. यात विरोधकांशी चर्चा करून मगच रोपवेचे काम सुरू करू, असं आमदार संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या राजगडावर होणारा रोपवे हा विषय फारच चर्चेला आला आहे. याविषयी आमदारांनी चर्चा केली. रोपवेवर अनेक प्रतिनिधींची मतमतांतरे चर्चेत आलेली आहेत. किल्ल्याचं महत्त्व कमी होईल आणि किल्ल्याला बाजारी स्वरूप येईल, अशी काही जण टीका करत आहेत.

रोपवेच्या निमित्ताने किल्ल्याचा पर्यायाने या भागाचा विकास व्हावा, पर्यटनास चालना मिळावी, पर्यटन वाढलं की रस्ते मजबूत करता येतील, हाच उद्देश आहे, असं संग्राम थोपटे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचं उत्पन्न वाढेल, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आता तोरणा आणि रायरेश्‍वर या दोन किल्ल्यांसाठीसुद्धा रोपवेची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, ‘आदित्य दादा यांना पत्रास कारण की, राजगडावर रोपवे बांधू नका. कारण गडावर आणि आजूबाजूला फुलपाखरु, हरण, मोर, ससे यांची घरं असतात. आपण गर्दी केली तर हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर काढू नका प्लीज’, असं पत्र पुण्यातील दुर्गवेड्या चिमुरडीनं महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या पत्त्यावर धाडलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘लशींसाठी मोदींचे जाहीर आभार माना’; युजीसीची महाविद्यालयांना अजब सूचना

‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटमुळे तिसरी लाट येणार का?; तज्ज्ञ म्हणतात…

आंबिल ओढा परिसरातील नागरिक आणि पोलीसांमध्ये तुफान राडा; नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

“महाविकास आघाडी सरकार हे शिवशाही सरकार नसून बेबंदशाही सरकार”

“सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुख यांचा थेट संबंध नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More