बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघणार?, 11 वाजता होणार महत्त्वाची बैठक

मुंबई | गेल्या 13 दिवसांपासून राज्यातील एस टी कर्मचारी संपावर आहेत. तसेच ऐन दिवाळीत कर्मचारी संपावर गेल्याने आणि महाराष्ट्रातील लाल परी बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला असून कर्मचाऱ्यांना सरकारने एक ऑफर दिली आहे.

एसटी कर्मचारी यांच्या महामंडळाच्या विलीनीकरणच्या महत्वाच्या आणि प्रमुख मागणीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीने अहवाल सादर करेपर्यंत आता मधला मार्ग काढण्यासाठी सरकारने अंतरिम पगारवाढ देण्यासंदर्भात पर्याय दिला आहे. त्यावर आता आज सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

परिवहन मंत्री अनिल परब आजच्या बैठकील हजर असणार आहेत. तसेच या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला आणि राजकीय वातावरण पेटवणाऱ्या या संपावर सरकार तोडगा काढण्यात यशस्वी होणार का?, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान, एकीकडे समितीचं काम सुरू आहे आणि समितीचा अहवाल हा 12 आठवड्यात द्यायचा आहे,  त्या प्रक्रियेला भरपूर वेळ लागणार असल्याने तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही, त्यामुळे अंतरीम वेतनवाढीचा पर्याय दिला असल्याचं परिवहन मंंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे 11 वाजता होणाऱ्या बैठकीत तोडगा निघणार का? आणि महाराष्ट्राची लालपरी पुन्हा रस्त्यावर धावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ; ‘त्या’ चॅटवरुन क्रांती रेडकरची पोलिसात धाव

लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर, प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

इंधन दर स्वस्त करण्यासाठी ‘हा’ आहे मोदी सरकारचा ‘मास्टर प्लान’

राज्य सरकारने दिलेली ‘ही’ ऑफर एसटी कर्मचारी मान्य करणार का?

…म्हणून ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमनं मागितली नारायण राणेंची माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More