बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron मुळे तिसरी लाट येणार?, आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरली असं वाटत असताना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं. ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा द.आफ्रिकेत वेगाने प्रसार झाला.ओमिक्रॉनमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली असताना आता ओमिक्रॉन व्हेरिएंट भारतातही दाखल झाला आहे.

ओमिक्रॉनमुळे धास्ती वाटत असताना सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यातला एक म्हणजे ओमिक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येणार का? CSIR इन्टिट्युट ऑफ जीनोमिक्स अँड इंटीग्रेटीव्ह बायोलॉजीचे प्रमुख डॉ. अनुराग अग्रवाल यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.

ओमिक्रॉन व्हायरस हा कोरोनाची तिसरी लाट (Third Wave Of Corona) आणण्याइतपत धोकादायक असल्याची माहिती डॉ. अग्रवाल यांनी दिली आहे.ओमिक्रॉन व्हेरिएंटने शरीरात प्रवेश केला तर त्याचा थेट परिणाम आपल्या इम्युनिटीवर होऊ शकतो. ही गोष्ट कोरोनाच्या दुसऱ्या कोणत्याच व्हेरिएंटमध्ये दिसली नसल्याचंही अग्रवाल म्हणाले.

दरम्यान, ज्या नागरिकांची इम्युनिटी चांगली आहे आणि शिवाय ज्यांचं लसीकरण देखील पूर्ण झालं आहे, अशा नागरिकांमध्ये हायब्रिड इम्युनीटी (Hybrid Immunity) पाहायला मिळते. अशा नागरिकांची संख्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर असल्याचंही डॉ. अनुराग अग्रवाल यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच, वाचा आजची आकडेवारी

मुंबई कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

योगी सरकारचा गजब कारभार! उद्घाटनात नारळ फोडायला गेले अन् रस्ताच फुटला

“अरे निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे, त्यांच्या नखाची सरही तुम्हाला नाही”

“बिनडोक लोक सत्तेत बसल्यावर अजून काय अपेक्षा करणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More