बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?, केंद्र सरकारकडून मिळाले ‘हे’ संकेत

नवी दिल्ली | गेल्या 2 वर्षात कोरोनाने (Corona) हाहाकार माजवला होता. भारतासह जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यानंतर आता कुठे कोरोना रूग्णसंख्या कमी होताना दिसत असताना कोरोनाच्या नव्या Omicron Varientने हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता पुन्हा लाॅकडाऊनचा (Lockdown) सामना करावा लागणार का?, असा सवाल आता सर्वसामान्य लोक उपस्थित करताना दिसत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी देशात Omicron Varientचे दोन रूग्ण आढळल्याने भारतात पुन्हा लाॅकडाऊन लागणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr. V. K. Paul) यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. देशात लाॅकडाऊन लावण्याची आताच गरज नाही, असं सुचक वक्तव्य डॉ. पॉल यांनी केलं आहे.

डॉ. पॉल यांच्या या वक्तव्यामुळे आता जर Omicron Varientचे रूग्ण वाढले तर पुन्हा लाॅकडाऊन होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. Omicron Varientचा धोका लक्षात घेता आता आणखी सतर्क राहण्याची गरज असल्याचं देखील डॉ. पॉल यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, कर्नाटकातील दोन लोकांची Omicron ची लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यांचं वय अनुक्रमे 66 वर्षे आणि 46 वर्षे असून त्यांना सौम्य लक्षणे असल्याचं देखील केंद्र सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे आता अधिक अधिक काळजी घेणयाची गरज आहे.

थोडक्यात बातम्या-

“चाणक्य समजणाऱ्यांना मात देणारे चाणक्य म्हणजे पवारसाहेब”

Omicron Variant चा लहान मुलांना धोका?; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

“R.R.Patil यांनी चोख काम केलं होतं, आता अभद्र युती तोडण्याची गरज”

च्युइंगम खाल्ल्याने कोरोना रोखता येतो?, शास्त्रज्ञांनी केला ‘हा’ दावा

मिर्झापूर वेब सीरिजमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, बॅालिवूडमध्ये खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More