Top News महाराष्ट्र मुंबई

मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे उत्तर प्रदेशाबाबत काही बोलणार की नाही?- रोहित पवार


मुंबई | उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सामूहिक बलात्कार झालेल्या पिडितेच्या घरच्यांना भेटण्यास निघालेले काँग्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले होते. या संपूर्ण प्रकाराव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पावर यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले की, मुंबई आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे यावर काही बोलणार नाही का असा सवाल त्यांनी केला आहे. आणखी किती दिवस गप्प बसणार की त्यांच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलीये. रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही. परंतू त्यांनी अप्रत्यक्षपणे कंगना रणावतला जाब विचारला असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, बलात्कार झालेल्या पिडितेचा मृतदेह कुटुंबीयांकडे न देता उत्तर प्रदेश पोलिसांनी अंतिम संस्कार उरकत पीडीतेवर बलात्कार झालाच नाही असं सांगितल्याने प्रकरण आणखीनच तापलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश

“भाजप सरकार सत्तेच्या मस्तीत, ते कधी कोसळतील हे त्यांनाही कळणार नाही”

ठाण्यात हिरानंदानी इस्टेट येथील सहा दुकानांना आग

…याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या