बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी होणार की नाही?’; ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा हा निर्णय

मुंबई | बारावीचा निकाल लागला आहे. आता पुढील वर्गासाठी म्हणजे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने असणार?, याबाबत पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे. कारण यंदा परीक्षा झाल्या नसल्यामुळे सरासरी निकाल हा 99 टक्क्यांच्या वर लागला आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी परीक्षा होणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र अशातच राज्य सरकारने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत आम्ही निर्णय घेतला आहे. बारावीचा बोर्डाचा जो निकाल लागला आहे, त्याच्या आधारावरच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा 26 ऑगस्ट पासून होणार आहे. तर इंजिनिअरिंगची सीईटी परीक्षा 4 ते 9 सप्टेंबर आणि 9 ते 14 सप्टेंबर या दोन सत्रात होणार आहे. एलएलबी सीईटी 16 ते 9 सप्टेंबर पासून सुरु होणार असल्याचंही उदय सामंत म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी खासगी महाविद्यालयांची फी कमी करण्यावही भाष्य केलं आहे.

दरम्यान, खाजगी महाविद्यालयांना फी कमी करण्यासाठी सूचना द्याव्या लागतील. यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यावर फी किती कमी करायची हे सांगितलं जाणार असल्याचं सामंत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘नवाब मलिकांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी ‘तो’ ठराव रद्द करावा’; भाजप नेत्याचं मलिकांना आव्हान

“राज्यपालांचे वर्तन दुर्दैवी, ते भाजप नेता म्हणून आरएसएससाठी काम करत आहेत”

संसदेत पेगॅसस प्रकरणावरून गदारोळ, राज्यसभेच्या अध्यक्षांनी TMCच्या खासदारांना केलं निलंबित

शहा आणि पवारांच्या ‘त्या’ बैठकीत नेमकं काय घडलं?, संजय राऊत म्हणाले…

प्रियांका चोप्राने मुंबईमधील दोन अलिशान बंगले विकले, ‘इतक्या’ कोटींची झाली डील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More