बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीकरण केल्यानंतर कोरोना होणार का?; संशोधनातून ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

नवी दिल्ली | महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळाला. पण आता हळूहळू दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या ही आटोक्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच देशभरात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे.

देशभरातील सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्र राज्यात पूर्ण झालं आहे. लसीकरणानंतर कोरोना होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला असून एका अभ्यासाअंती महत्त्वाच्या गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत. लसीकरण झाल्यानंतर कोरोनाबाधित होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं या अभ्यासामध्ये स्पष्ट झालं आहे.

लसींचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांपैकी रुग्णालयात कोरोनामुळे दाखल होण्याचे प्रमाण तब्बल 80 टक्‍क्‍यांनी घटल्याचं या संशोधनात स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच ज्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात येतं, त्यापैकी ऑक्सिजन लावण्याची गरज 8 टक्क्यांवरूनही कमी रुग्णांना असल्याचं समोर आलं आहे.

लसींचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांपैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं आढळून आल्याने कोरोनामधून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून चिंतेचं वातावरण पसरलं असताना आता दिलासादायक माहिती समोर आली आहे. सरकार व प्रशासनातर्फे नागरिकांना कोरोना लस घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर काही लोकांनी भारतात तिसऱ्या लाटेचा धोकाही व्यक्त केला आहे. परंतु, लसीकरण मोठ्या संख्येने झाल्यास तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचं काही तज्ज्ञ बोलून दाखवतात.

थोडक्यात बातम्या –

पंतप्रधान मोदी करणार काश्मिरी नेत्यांसोबत बैठक; बैठकीपुर्वीच पाकिस्तानात चिंतेचं वातावरण

तृतीयपंथीयांसाठी ‘या’ महापालिकेत राज्यातील पहिलं विशेष लसीकरण पडलं पार

धक्कादायक! लग्नानंतर मित्रानं बोलणं बंद केल्यानं मैत्रिणीने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

दिलासादायक! राज्यातल्या कोरोनोबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

पॉर्न पाहून बहिणीने आपल्या लहान भावासोबत ठेवले शारीरिक संबंध, पोट दिसल्यावर कुटुंब हादरलं!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More