बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जास्त मद्यपान केल्यामुळे मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम मिळणार का?, सर्वोच्च न्यायालय म्हणालं…

नवी दिल्ली | जास्त दारू प्यायल्याने गुदमरुन मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांचा विम्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. हिमाचल प्रदेश राज्य वन महामंडळात तैनात चौकीदाराची कायदेशीर वारसदार असलेल्या नर्मदा देवी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण आदेश दिला आहे.

या प्रकरणातील विमा कंपनीची जबाबदारी थेट अपघातामुळे इजा झाल्यास नुकसान भरपाई देणं ही आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. तसेच न्यायमूर्ती एम.एम. शांतानागौदर आणि न्यायमूर्ती विनीत सरन यांच्या खंडपीठाने हा मृत्यू एखाद्या अपघातामुळे झाला नसल्याचं स्पष्ट केलं.

हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यात या चौकीदाराचा मृत्यू 1997 मध्ये सात ते आठ ऑक्टोबरच्या दरम्यान मध्यरात्री झाला होता. शवविच्छेदन केलं असता अधिक प्रमाणात दारू पिल्यानं गुदमरुन त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. यावर अशाप्रकारे झालेला मृत्यू हा अपघाती मृत्यूच्या श्रेणीमध्ये येत नाही. तसंच अशा घटनांमध्ये विमा पॉलिसीअंतर्गत नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीची नसते, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.

याप्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती पाहाता राष्ट्रीय आयोगाच्या 24 एप्रिल 2009 च्या आदेशात न्यायालयाला कोणताही हस्तक्षेप करण्याचं कारण दिसत नसल्याचं खंडपीठानं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मी शिवसैनिक आहे, आम्ही महिलांना धमकावण्याचं काम करत नाही- अरविंद सावंत

“ए भाई , तू जो कोण असशील…”; भाई जगताप यांच्यावर अमृता फडणवीस भडकल्या

“व्वा रे बहाद्दर…महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय?”

“पोलीसांची खाती स्वत:च्या बायकोच्या बँकेत वर्ग केली तेव्हा फडणवीसांनी राजीनामा दिला होता का?”

गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांवर डॅशिंग IPS कृष्ण प्रकाश म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More