बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात पुन्हा मास्कसक्ती होणार?, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतखाली महत्वाची बैठक

मुंबई | देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यानंतर कोरोना रूग्णसंख्येचा आलेख खाली आला होता. कोरोना रूग्णांमध्ये मोठी घट झाल्यानंतर राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवून नागरिकांना मास्कमुक्त केले होते. त्यातच आता पुन्हा एकदा कोरोना रूग्ण वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. टास्ट फोर्सच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. मुंबई आणि पुणे शहरात कोरोना रूग्ण वाढल्याने मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मास्कसक्तीच्या विषयावर भाष्य केलं आहे. राज्यात मास्क बंधनकारक करण्याचा विचार केला जात आहे का?, असा सवाल अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर विचार करावाच लागेल. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये डॉक्टर कोरोनाविषयी सर्व माहिती देतात. जगात काय सुरू आहे, देशात काय चाललंय, राज्यांमध्ये काय सुरू आहे, राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काय सुरू आहे, याची माहिती देतात, असं अजित पवारांनी सांगितलं. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या वाढत आहे. परंतु, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि बेडवर कमी लोक आहेत, असं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘कोलकातामधील गायक केकेपेक्षा चांगलं गाऊ शकतात’; ‘या’ गायकाचं वादग्रस्त वक्तव्य

चिंताजनक! राज्यात कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ

‘धनंजय मुंडेंनी माझ्या आईची हत्या केली’; करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप

‘त्या’ व्यक्तीला मी Mercedes-Benz बक्षीस म्हणून देणार- नितेश राणे

मोठी बातमी! काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More