बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ब्लॅक फंगसच्या औषधावर आणि कोरोना लसीवर GST लागणार का? अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. या लाटेचा परिणाम सध्या कमी होत असला तरी झालेलं नुकसान मोठं आहे. काळ्या बुरशीच्या औषधावर कर आणि कोरोना लसीवरील जीएसटी यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. आर्थिक नुकसानाबरोबरच इतर काही आजारांनी देखील यावेळी डोकं वर काढलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी काऊन्सिलची 44 वी महत्वाची बैठक पार पडली. कोरोनाकाळात ही बैठक महत्त्वाची ठरली कारण यामध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब झाला. या बैठकीत कोरोना लसीवरील जीएसटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि निर्बंधांचा परिणाम नोकऱ्यांवर झाला आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागत आहे. त्यातच अशा आजारांचा संसर्ग झाला तर त्यासाठी खर्च करताना अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची अर्थिकदृष्ट्या परवड होत आहे. या धर्तीवर कोरोनासह, ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी आवश्यक घटकांच्या किंमती कमी करव्यात अशी मागणी केली जात आहे.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अर्थमंत्र्यांनी अशी माहिती दिली की, जीएसटी काउन्सिलमध्ये ब्लॅक फंगसचे औषध करमुक्त करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय जीएसटी काउन्सिलने रेमडेसिवीर औषधावरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्के करण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे. ऑक्सीमीटर, मेडिकल ग्रेडचा ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटरवरील जीएसटी देखील 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान, सीतारमन यांनी असे म्हटलं की, केंद्र सरकार 75 टक्के लस खरेदी करत आहे आणि त्यावर जीएसटी देखील भरत आहे. लोकांना सरकारी दवाखान्यात जे हे 75 टक्के लस मोफत उपलब्ध केले जात आहे, त्याचा जनतेवर काही परिणाम होणार नाही, असा दिलासाही सीतारामन यांनी दिला आहे. तर, इलेक्ट्रिक फर्नेसेज आणि टेंपरेचर चेकिंग इक्विपमेंटवरील जीएसटीमध्ये देखील कपात करुन 5 टक्के तर रुग्णवाहिकांवरील जीएसटी 12 टक्के करण्यात आला आहे. हे नवे दर सप्टेंबरपर्यंत वैध असतील.

थोडक्यात बातम्या –

वारकऱ्यांच्या केसाला धक्का लागला तर गाठ आमच्याशी आहे- तुषार भोसले

‘नागिन’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं सोडला अभिनय; केला ‘हा’ मोठा खुलासा

“ठाकरे सरकारमधील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का?, नाहीतर मराठा नाहीत जाहीर करा”

“कोणी कितीही रणनीती आखू द्या, आजही मोदी आहेत आणि 2024 लाही मोदीच सत्तेत असतील”

फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेनेला गुलामासारखी वागणूक मिळाली- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More