नवी दिल्ली | दिल्लीत कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल? याची जोरदार चर्चा सुरु आहे. लोकसभेची 2024 ची (Lok Shaba election) निवडणूक लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाचा (cabinet minister )विस्तार होणार आहे.
या विस्तारात चांगली कामगिरी नसणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच भारतीय जनता पक्षात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळातील काही जणांना संघटनेची जबाबदारी दिली जाणार आहे.
गुजरात निवणुकीत अभूतपुर्व यश मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपूत्र सी.आर.पाटील यांना दिल्लीत बोलवले जाणार आहे. त्यांच्यांकडे महत्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं कळतंय.
दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार याकडेही राज्यातील जनतेसह राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-