शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ‘या’ पक्षाचा समावेश होणार?

मुुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईत जे बदल झाले जी विकासकामे झालीत त्याबद्दल सांगितलं. पंतप्रधानांनी वारवांर त्यांच्या भाषणात डबल इंजिन सरकारचा उल्लेख केला. राज्यात डबल इंजिन सरकार असल्यामुळे सहा महिन्यात मुंबईत कामं झाली आहेत. असं म्हणत शिंदे-फडणवीस जोडीचं कौतुक मोदीनी तोंडभरुन केलं.

मोदींनी त्यांच्या भाषणात डबल इंजिन सरकार असा उल्लेख केला मात्र शिंदेच्या भाषणात मात्र शिंदेनी ट्रिपल इंजिनचा उल्लेख केला. आम्हाला मुंबईचा (Mumbai) चेहरामोहरा बदलायचा आहे. मुंबईचा विकास करायचा आहे. 25 वर्षात जे झालं नाही ते करायचं आहे.

मुंबईकरांना आमचं काम दिसत आहे. येत्या तीन वर्षात आम्ही मुंबईचा कायापालट करु. असं आश्वासन शिंदेंनी दिलयं. मात्र यावेळी ते म्हणाले की काही दिवसांतच मुंबई महानरपालिकेच्या(BMC) निवडणुका येत आहे. त्यावेळी विकासाच्या या डबल इंजिनला ट्रिपल इंजिनमध्ये बदलू. भाषणात त्यांनी वापरलेले ट्रिपल इंजिन हा शब्द सधा चर्चेचा विषय़ ठरला आहे.

शिंदेंनी ट्रिपल इंजिन सरकार असा उल्लेख का केला असेल अशी चर्चा सुरु आहे. ते ट्रिपल इंजिन मनसे असणार आहे का, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारर सत्तेत आल्यापासून त्यांची मनसेसोबतची जवळीक वाढली आहे.

अनेकदा राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्यासोबत शिंदे आणि फडणवीस यांच्या भेटीगाठी होत असतात. दोन्ही नेत्यांचे राज ठाकरेंशी चांगले संबध आहेत. त्यामुळे हे शक्य होऊ शकतं. मात्र राजकारणात केव्हा काहीही होऊ शकत त्यामुळे मनसे शिंदे-फडणवीस सरकार सोबत युती करणार का? हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या