‘त्या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का?, नाना पटोलेंचा सरकारला सवाल
मुंबई | राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अधिवेशनामध्ये शेतकरी विज तोडणीचा मुद्दा अनेक नेत्यांनी लावून धरला होता. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफीवर सवाल केला आहे. त्यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
2016 मध्ये झालेली कर्जमाफीची घोषणा झाली होती. अजूनही खूप शेतकरी या योजनेतून राहिलेले आहेत. कटऑफ डेट टाकून महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना सुरू केली. 2016 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी योजना सुरू केली. या दोन्ही योजनांमध्ये अनेक शेतकऱ्यांना लाभ घेता आला नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
या स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांचा दोष नाही. जे शेतकरी राहिले आहेत. 50 हजार भरवले आहेत 2 लाख भरू असं सांगितलं होतं. अशा परिस्थितीमध्ये मागील योजनांमध्ये राहिलेले आणि आताचे सुटलेले शेतकऱ्यांचा त्या कर्जमाफीमध्ये समावेश होईल का?, असा सवाल नाना पटोलेंनी केला.
दरम्यान, नाना पटोले यांच्या सवालांवर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी उत्तर दिलं. डिसेंबर 2019 मध्ये नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. कर्जमाफीची घोषणा करत असताना पूर्वीच्या कर्जमाफी योजना पूर्ण झाल्या आहेत, असं धरून पुढे जातात. ही कर्जमाफी योजना होत असताना यामध्ये बँकांनी पुढाकार घेतला. बँकांशी आधार प्रामाणिक करण्यामध्ये पुढाकार घेतला. लोकांना, शेतकऱ्यांना त्रास न होता ही योजना पुर्ण झाली. त्यामुळे या योजनेच्या बाबतीत कुठल्याही बाबतीत तक्रारी नाहीत.
थोडक्यात बातम्या-
“शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये, आम्ही तुमच्यासाठी संघर्ष करीत राहू”
कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी कोविड टास्क फोर्सचा गंभीर इशारा, म्हणाले…
संजय राऊत यांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद, नेमका कोणता गौप्यस्फोट करणार?
बायकोसाठी कायपण! …म्हणून युद्धाच्या संकटात भारतीयाचा मायदेशी परतण्यास नकार
“हे सरकार बेवड्यांसाठी पॉलिसी करू शकतं, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही
Comments are closed.